ब्लॉग कसा तयार करावा

                                             ब्लॉग कसा  तयार करावा               1.  सर्व प्रथम आपण Gmail वर आपले ई-मेल खाते तयार करावे.
2.   त्यांनंतर www.blogger.com ही वेबसाईट ओपन करुन त्यात आपल्या ई-मेल अकाऊंटने लॉगिन करावे.
3.  लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल. यात New Blog वर क्लिक करावे.


 4.    खालील विंडो मध्ये Blog Tittle टाईप्‍ा करावे.

    
    तुमच्या ब्लॉगचा इंटरनेटवर address काय ठेवायचा आहे तो          Address या रकान्यात टाईप करावा.
         जसे –https://shindeguruji.blogspot.com
          Template  यामध्ये तुमच्या ब्लॉगला कशा प्रकारचे Background हवे असेल ते खाली दिलेल्या डिझाईन मधून Select करावे. व खालील Create Blog वर क्लिक करावे.
5.  आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे. व खालील विंडो दिसेल. View Blog वर क्लिक केल्यास तुम्हाला  तुमचा ब्लॉग दिसेल.


6.   खाली दिलेल्या विडोंमध्ये  View Blog शेजारील पाँइंटवर क्लिक केल्यास आपणास  Post, Pages, Layout, Templates, Setting यासारख्या अनेक ऑपशन दिसतील त्या वापरुन तुम्ही तुमचा ब्लॉग सजवू शकता.


7.   आपण तयार केलेल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करायचे असल्यास आपण ते करु शकता माञ त्यासाठी वार्षिक काही रक्कम आपणास भरावी लागेल.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा